Ad will apear here
Next
‘जग्‍वार लँड रोव्‍हर’तर्फे भारतातील पहिल्‍या बुटिक शोरूमचे उद्घाटन

बेंगळुरू : जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियातर्फे बेंगळुरूमधील कन्‍नीन्‍घम रोड येथे मार्कलँड यांच्या साथीने नवीन बुटिक शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी आणि मार्कलँडचे संचालक नवीन फिलिप यांच्‍या हस्‍ते या नवीन केंद्राचे उद्घाटन करण्‍यात आले.

बेंगळुरूमधील मध्‍यवर्ती ठिकाणी असलेले हे शोरूम ग्राहकांसाठी सोइस्‍कर ठिकाणी असून, जग्‍वार व लँड रोव्‍हरचा पोर्टफोलिओ सादर करते. हे बुटिक शोरूम डिजिटल वैयक्तिक स्‍टुडिओसह सुसज्जित असून, यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळत आहे; तसेच या शोरूममध्ये आधुनिक अॅक्‍सेसरीज व ब्रँडेड सामग्री विक्रीसाठी उपलब्ध आहे. 


‘जेएलआरआयएल’ अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले, ‘आम्‍हाला आमच्‍या प्रमुख बाजारपेठांपैकी एक बेंगळुरूमध्‍ये बुटिक शोरूम सादर करताना आनंद होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानांमधील आधुनिकतेने सक्षम असलेले हे नवीन शोरूम आम्‍हाला दोन आयकॉनिक ब्रॅंड्ससह ग्राहकांचा अनुभव व सहभाग वाढवण्‍यामध्‍ये मदत करेल. शोरूम मध्‍यवर्ती ठिकाणी स्थित आहे आणि बेंगळुरूमधील जग्‍वार लँड रोव्‍हरचे अनेक चाहते व ग्राहकांसाठी अगदी जवळ आहे.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZJACC
Similar Posts
बेंगळुरूमध्ये मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर बेंगळुरू : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने बेंगळुरू या भारतातील टेक कॅपिटलमध्ये जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर जेथे असणार आहे त्या ब्रिगेड रोडवरील वौशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसचे नूतनीकरण करण्यात आले आहे व आर्किटेक्चरचा एक भव्य नमुना म्हणून जतन करण्यात आले आहे
पुण्यात होणार ‘जीआयआयएस’चा पहिला स्मार्ट कॅम्पस मुंबई : सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) भारतातील पहिला स्मार्ट कॅम्पस पुणे येथे होणार आहे. सिंगापूरमध्ये २०१८मध्ये सादर केलेली आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्मार्ट कॅम्पसची संकल्पना हडपसर आणि बालेवाडीत अंमलात आणली जाणार आहे. नव्या पिढीला २१व्या शतकातील कौशल्ये
‘लँड रोव्‍हर’तर्फे भारतात ‘दी अबव्‍ह अॅंड बियाँड टूर’ची घोषणा मुंबई : ‘जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया’ने ‘दी अबव्‍ह अॅंड बियाँड टूर’ची घोषणा केली. १२ एप्रिल २०१९ रोजी अहमदाबादमध्‍ये पहिला इव्‍हेंट झाला असून, टूर भारतातील अनेक शहरांमध्‍ये प्रवास करेल आणि ‘लँड रोव्‍हर’च्‍या ग्राहकांना सुरक्षित, व सर्वसमावेशक पद्धतीने ऑफ-रोड ड्राइव्‍हचा अनोखा अनुभव देणार आहे.
‘जग्वार आय-पेस’ला ‘२०१९ वर्ल्ड कार अॅवॉर्ड’ मुंबई : ऑल-इलेक्ट्रिक ‘जग्वार आय-पेस’ने ‘२०१९ वर्ल्ड कार अॅवॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या गाडीने मानाचे ‘२०१९ वर्ल्ड कार ऑफ दी इअर’ आणि ‘वर्ल्ड कार डिझाइन ऑफ दी इअर’ हे पुरस्कार पटकावलेच. शिवाय, या गाडीला वर्ल्ड ग्रीन कार हा किताबही देण्यात आला. या पुरस्कारांच्या १५ वर्षांच्या इतिहासात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language